जिजा-सावित्रीच्या विचारांची ढाल...

सौ. धनश्री वहिनी लाड – क्रांतीची नवी मशाल!

केवळ घोषणा नाही, तर कृतीतून घडवलेली क्रांती. महिलांच्या आरोग्य, स्वावलंबन आणि शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

View Galley

क्रांती महिला प्रतिष्ठान

जिजा-सावित्रीच्या विचारांची ढाल... स्त्री सक्षमीकरणासाठी क्रांतीची यशस्वी वाटचाल! नाव: सौ. धनश्री वहिनी लाड पद: अध्यक्षा, क्रांती महिला प्रतिष्ठान.

आमचा संकल्प

समर्थ महिला, सशक्त समाज!

नुसती आश्वासनं देऊन आम्हाला राजकारण करायचं नाहीये, तर प्रत्येक घराघरात सकारात्मक बदल घडवायचा आहे. आमचा संकल्प आहे – आरोग्यसंपन्न माता, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भगिनी आणि कौशल्यवान तरुण पिढी!

प्रमुख उपक्रम

जिजा-सावित्रीच्या विचारांची ढाल... स्त्री सक्षमीकरणासाठी क्रांतीची यशस्वी वाटचाल!"

🩸 मिशन HB (आरोग्य क्रांती)

“घरचा कणा असलेल्या स्त्रीचं आरोग्य हीच आमची प्राथमिकता!” आम्ही फक्त तपासणी करून थांबलो नाही, तर ‘मिशन HB’ च्या माध्यमातून प्रत्येक महिलेचे हिमोग्लोबिन वाढवून तिला सुदृढ बनवण्याचा विडा उचलला आहे. आरोग्याची ही चळवळ आता घराघरात पोहोचली आहे.

🤝 निराधारांना आधार (शरद आत्मनिर्भर)

“संकटाच्या काळात खंबीर साथ!” ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेला, त्या कुटुंबांना सावरण्यासाठी आम्ही ‘शरद आत्मनिर्भर’ योजना राबवली. शेकडो महिलांना स्वयंरोजगाराचे साहित्य देऊन त्यांना पुन्हा सन्मानाने जगायला शिकवले.

🎓 स्किल-थ्रिल (कौशल्य विकास)

“नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा, उद्योग निर्माण करा!” ‘स्किल-थ्रिल’ फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण केली. १८ पेक्षा जास्त स्टॉल्स आणि प्रत्यक्ष मॅनेजमेंटचा अनुभव – शिक्षणाला जेव्हा कौशल्याची जोड मिळते, तेव्हाच प्रगती होते!

वहिनींचे व्हिजन

आजची स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित नाही, ती बरोबरीने संघर्ष करायला शिकली आहे. क्रांती महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला एक असा समाज घडवायचा आहे जिथे प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल. आई-वडिलांची काळजी घेणाऱ्या लेकींपासून ते स्वतःचा उद्योग चालवणाऱ्या उद्योजिकांपर्यंत सर्वांना बळ देणे हेच माझे ध्येय आहे.